Mahalakshmi Rajyog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा नऊ ग्रहांपैकी सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत अंदाजे अडीच दिवस राहतो आणि सतत कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करत असतो. सध्या चंद्र वृषभ राशीत भ्रमण करत आहे. मनाचा कारक असलेला चंद्र ९ ऑगस्ट रोजी स्वत:ची राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करेल. तिथे तो आधीच त्याच राशीत असलेल्या मंगळासोबत युती करून महालक्ष्मी राजयोग तयार करेल.
ग्रहांचा अधिपती असलेला मंगळ रविवार २ ऑगस्टच्या रात्री मिथुन राशीत आला आहे. तो १८ सप्टेंबरपर्यंत तिथेच राहील. परिणामी, कोणत्या ना कोणत्या ग्रहासोबत युती किंवा दृष्टी योग सुरूच राहतील. शिवाय कुंभ राशीत असलेला राहू मंगळावर त्याची पाचवी दृष्टी टाकत आहे. महालक्ष्मी राजयोग काही विशिष्ट राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. चंद्र आणि मंगळाच्या युतीने तयार झालेला महालक्ष्मी राजयोग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो याबाबत जाणून घेऊ…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, रविवार ९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. तिथे मंगळ आधीच उपस्थित आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल. चंद्र ११ ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील आणि त्यानंतर तो कर्क राशीत प्रवेश करेल. परिणामी, सुमारे अडीच दिवस टिकणाऱ्या या राजयोगाचा प्रभाव १२ राशींमध्ये दीर्घकाळ जाणवू शकतो.
सिंह राशी
मंगळ आणि चंद्राची युती सिंह राशीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. मंगळ आणि चंद्राच्या युतीने तयार झालेला महालक्ष्मी राजयोग तुमच्या राशीपासून ११व्या घरात होत आहे. परिणामी सिंह राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होऊ शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. प्रभावशाली लोकांकडून पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. पदोन्नती, वेतनवाढ आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि कठीण कामे यशस्वीपणे पूर्ण करण्याची संधी मिळेल.
व्यापाऱ्यांना मोठ्या ऑर्डर्स मिळण्याची, रखडलेला पैसा वसून होण्याची आणि उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती तुमच्याकडे नवन प्रस्ताव, भागीदारी किंवा व्यवसायाची संधी घेऊन येऊ शकतो. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. तुम्हाला मोठ्या भावंडांकडून किंवा मित्रांकडून पाठिंबा मिळेल. तसंच तुमच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकामुळे तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ देणे आवश्यक असेल. नाहीतर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
तूळ राशी
मंगळ आणि चंद्र यांच्यातील महालक्ष्मी राजयोग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक प्रकारे विशेष ठरू शकतो. हा राजयोग तूळ राशीच्या नवव्या घरात होत आहे. परिणामी त्यांची मेहनत आणि समर्पण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्य घेऊन येऊ शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित कामे तसंच शासकीय कामे पूर्ण होऊ शकतात.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखादा सरकारी प्रकल्प हाती घेण्याच इच्छा बाळगत असाल, तर या काळात तुम्हाला यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. व्यवसायालाही फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो.
मकर राशी
महालक्ष्मी राजयोग मकर राशीसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. या राशीत सहाव्या घरात मंगळ आणि चंद्राची युती होईल. त्यामुळे नोकरदार व्यक्तींना पदोन्नती आणि अधिक जबाबदाऱ्या मिळू शकतात. न्यायालयीन खटल्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आजारपण आणि कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे. हा काळ व्यावसायिकांसाठीही अनुकूल ठरू शकत. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.
