Krishna Janmashtami Mahalakshmi Yog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात महालक्ष्मी योग हा अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो, ती व्यक्ती आयुष्यात भरपूर पैसा कमावते आणि समाजात मान-सन्मान मिळवते. हा योग मंगळ आणि चंद्राच्या युतीने (एकत्र येण्याने) तयार होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ सप्टेंबरला हा शुभ योग मिथुन राशीत तयार होणार आहे. मिथुन राशीत मंगळ ग्रह आधीपासूनच विराजमान आहे आणि ५ सप्टेंबरला चंद्रही याच राशीत प्रवेश करील. या दोन ग्रहांच्या युतीने बनणारा महालक्ष्मी योग कोणत्या राशींच्या लोकांसाठी सर्वांत जास्त फायदेशीर ठरेल, ते पाहूया.
१. सिंह (Leo) – आर्थिक स्थितीत होईल सुधारणा
महालक्ष्मी योग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यापाऱ्यांना मोठ्या व्यावसायिक ऑर्डर्स मिळण्याचे संकेत आहेत, तर नोकरदार वर्गासाठी पगारवाढीचे योग आहेत.
२. मिथुन (Gemini) – आत्मविश्वास वाढेल
महालक्ष्मी योग मिथुन राशीतच तयार होत आहे. त्यामुळे या योगाचा तुम्हाला विशेष लाभ मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात चांगला नफा देतील. अचानक धनलाभाचे संकेत असून, व्यवसायातही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
३. मकर (Capricorn) – आर्थिक बाजू होईल मजबूत
महालक्ष्मी योग राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ सिद्ध होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि पैशांचा ओघ वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता असून, अडकलेला पैसा परत मिळू शकतो.
४. तूळ (Libra) – एखाद्या कामात मिळेल मोठे यश
तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग मंगलकारी ठरेल. तुमची अडकलेली सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात. इच्छित स्थळी नोकरी मिळण्याचे योग आहेत. एखाद्या कामात मोठे यश मिळू शकते. तसेच एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचेही शुभ योग बनत आहेत.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
