Navpancham Mahalaxmi Rajyog 2026 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि गुरू या दोन्ही ग्रहांना शुभ आणि शक्तिशाली ग्रह मानले जाते. कारण हे ग्रह जीवनात प्रतिष्ठा, पद, यश आणि सन्मानाचे कारक असतात, त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीलाही तितकेच महत्त्व आहे. या महिन्याच्या १६ तारखेला दोन्ही ग्रहांचा कर्क राशीत संयोग होईल, या राशीत गुरू ग्रह आधीच स्थित आहे. यात सूर्य १६ जुलै रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

जेव्हा सूर्य आणि गुरू एकत्र येईल तेव्हा शुभ राजयोग निर्माण होतील. कर्क राशीतील या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे नवपंचम योग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. हा योग तीन राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. त्यांच्या आयुष्यात धनलाभासह प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

मेष :

सूर्य आणि गुरूचा हा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या काळात त्यांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि प्रमोशन मिळू शकते., दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन :

महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी हा राजयोग जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून यातून चांगला नफा मिळू शकतो.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)