Rashi Bhavishya 26 March 2026 In Marathi : आज २७ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी असणार आहे. त्याचबरोबर सर्वार्थसिद्धि योग जुळून येईल आणि पुनर्वसु नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजता सुरु होईल ते ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमच्या राशीचा शुक्रवार कसा जाईल जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, २७ मार्च २०२६ (Dainik Rashi Bhavishya 27 March 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
एकाच कामात अधिक लक्ष द्यावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनाची द्विधावस्था वाढू शकते. संयम बाळगावा लागेल. आवडत्या गोष्टीत मन रमवा.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
मितभाषी दृष्टीकोनातून वागाल. मनापेक्षा बुद्धीचा अधिक वापर कराल. फार संभ्रमात अडकू नका. सर्वांना आनंद वाटण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या स्वभावाची उत्तम छाप पडेल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
घरगुती कामात मन रमवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. कामे उगाचच खोळंबून राहतील.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
मौजमजेकडे अधिक कल राहील. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. स्त्री सौख्यात वाढ होईल. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढू शकतो. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. पैशाचा अपव्यय टाळावा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्यावा.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊ शकतात. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढेल. उगाचच निरूत्साही वाटेल. आळस झटकून टाकावा.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
मानसिक गोंधळ दूर सारावा. फार काळजी करत बसू नका. लेखक वर्गाला चांगला लाभ मिळेल. बौद्धिक डावपेच खेळाल. सूचक स्वप्न पडू शकेल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
संभाषणाची आवड जोपासाल. घरी नातेवाईक गोळा होतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. नवीन मित्र जोडले जातील. प्रवासात खर्च वाढू शकतो.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
कौटुंबिक गोष्टींचे भान राखावे. लेखक, प्रकाशक यांना चांगला लाभ होईल. लहान प्रवासाचा योग येईल. सर्व बाबी औत्सुक्याने जाणून घ्याल. काही गोष्टींचे मनन करावे.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
प्रकृतीची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च करू नका. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. हातातील कामात अधिक लक्ष घालावे.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
चौकसपणे गोष्टी समजून घ्याल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल. भावना उत्तम प्रकारे मांडाल. घरगुती जबाबदारी वाढेल. कामाचे योग्य नियोजन करावे.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
काहीसा थकवा जाणवेल. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल.
