Mahashivratri 2026 Graha Gochar: हिंदू धर्मात महाशिवरात्र खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्र १५ फेब्रुवारी (रविवारी) रोजी साजरी केली जाईल. त्या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो, त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात. दरम्यान, यंदा महाशिवरात्रीचा दिवस अधिक पावन होईल कारण या दिवशी काही विशेष ग्रहांचे गोचर झालेले पाहायला मिळेल.

पंचांगानुसार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ, ग्रहांचा राजकुमार बुध आणि मनाचा कारक ग्रह चंद्राचे गोचर होईल. या दिवशी दुपारी १२ वाजता मंगळाचे धनिष्ठा नक्षत्रात गोचर होईल. चंद्र मकर राशीत आणि रात्री ९ वाजता बुध पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. महाशिवरात्रीच्या मोठ्या ग्रहांचे होणारे हे गोचर नक्कीच काही राशींच्या आयुष्यात सुख-संपन्नता घेऊन येईल.

महाशिवरात्रीच्या दिवशी ‘या’ राशींचे भाग्य उजळणार

वृषभ (Vrushabh Rashi)

महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी मंगळ, बुध आणि चंद्राचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस लाभदायी असेल. या काळात तणाव कमी होईल. काहींना नोकरी मिळेल, तर काहींना आर्थिकदृष्ट्या समाधानी वाटेल. शिवाय, त्यांच्या आरोग्यावर फारसा परिणाम होणार नाही. ग्रह आणि भगवान महादेवाच्या आशीर्वादामुळे वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

तूळ (Tula Rashi)

महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी मंगळ, बुध आणि चंद्राचे भ्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. काही अविवाहितांसाठी लग्नाच्या योजना पुढे जातील, तर अनेक विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासोबत सुखी क्षण व्यतीत करतील. या काळात अनेक अनपेक्षित गोष्टी घडतील. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आणि त्यानंतरचा काळ संस्मरणीय असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल, तर गृहिणी त्यांचे नातेसंबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. मुलांची हौस पूर्ण कराल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांसाठी देखील महाशिवरात्रीचा दिवस खूपच शुभ ठरेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होईल. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीलवर आधारित आहे.)