Mahashivratri Favourite Rashi : आज महाशिवरात्री आहे. धार्मिक श्रद्धा अशी आहे की, भगवान शिव आणि देवी पार्वतीचा यांचा विवाह सुद्धा आज झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते आणि अनेक ठिकाणी भव्य शिव मिरवणुका देखील काढल्या जातात. २०२६ मध्ये, हा उत्सव आज १५ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. तर १२ राशींपैकी महादेवाच्या सगळ्यात आवडत्या राशी कोणत्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

असे मानले जाते की या दिवशी भक्तीभावाने शिव आणि शक्तीची पूजा केल्याने अविवाहित महिलांना योग्य पती मिळतो, तर विवाहित जोडप्यांना सुखी वैवाहिक जीवन मिळते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, हा दिवस काही राशींसाठी विशेषतः फलदायी मानला जातो. असे म्हटले जाते की या राशींना भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री शुभ संकेत घेऊन येऊ शकते. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, मानसिक ताण कमी होईल, कुटुंबात शांती, आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक श्रद्धेनुसार, चंद्राचा भगवान शिवाशी खोलवर संबंध आहे आणि वृषभ राशीचा विशेष प्रभाव असल्याचे मानले जाते.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी हा सण सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी शक्य आहेत, व्यवसायात गुंतलेल्यांना चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. पूर्वीच्या गुंतवणुकीतूनही नफा मिळू शकतो आणि जीवनात आनंद येईल.

मकर

महाशिवरात्रीच्या आसपास मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. दीर्घकालीन समस्यांपासून मुक्तता मिळण्याचे संकेत आहेत. काही चांगल्या बातम्या मनाला आनंद देऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात, शनिदेवाला मकर राशीचा अधिपती मानले जाते आणि धार्मिक श्रद्धेनुसार, शनिदेव भगवान शिवाचे महान भक्त आहेत.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी, हा सण त्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो. त्यांच्या कारकिर्दीत यश मिळण्याची आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीमुळे नफा मिळेल, मानसिक शांती, कौटुंबिक आनंद आणि समृद्धी तुमच्या दारी येईल.