Conjunction Of Saturn And Venus: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा प्रभाव समस्त मानवजातीवर व परिणामी पृथ्वीवर होत असतो. अशातच जेव्हा मोठ्या ग्रहांची युती होते तेव्हा त्याचा परिणाम शुभ- अशुभ दोन्ही प्रकारे दांडगा असतो. येत्या महाशिवरात्रीला ३० वर्षांनी अनेक शुभ योग तयार होत आहेत. गुरु व शुक्राच्या युतीने तयार होणारा नियती पालट योग तसेच शनी व सूर्याची युती ही शिवभक्तांना लाभदायक ठरू शकतो. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या तिथीवरच शुक्र व शनीची युती सुद्धा कायम असणार आहे. काही दिवसांपूर्वीच शुक्राने शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ मध्ये गोचर केले होते. शनी व शुक्र यांच्यात मित्रत्व भाव आहे त्यामुळे या युतीने तीन राशींना मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या चला तर पाहुयात..
मेष (Aries Zodiac)
मेष राशीच्या मंडळींसाठी शनी व शुक्राची युती अत्यंत लाभदायक ठरू शकते. यामुळे येत्या काळात आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत धनाढ्य योग बानू शकतो. शनी- शुक्राची युती लाभदायक स्थानी असल्याने तुम्हाला कर्म व मेहनतीला साजेसे फळ मिळू शकते. जर आपले काम परदेशी कंपनीशी संबंधित असेल तर आपल्याला येत्या काळात मोठ्या धनलाभाचे योग आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभाची संधी आहे.
हे ही वाचा<< शनी लोहाच्या पाउलांनी मार्गी होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? धनलाभ होताना ‘हा’ ठरू शकतो धोका
मिथुन (Gemini Zodiac)
शनी व शुक्राची युती मिथुन राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. ही युती मिथुन राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहे. शुक्र ग्रह आपल्या राशीच्या कुंडलीत बाराव्या व पाचव्या स्थानाचा स्वामी आहे. आपल्या गोचर कुंडलीत धनाढ्य योग असल्याने पगारवाढ व अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. आपल्याला कला, विज्ञान व मीडिया क्षेत्रात सुद्धा मोठ्या व महत्त्वाच्या संधी मिळू शकतात. आपल्याला भावंडांकडून मदत लाभू शकते. कामाच्या निमित्ताने परदेशी प्रवासाची संधी मिळू शकते.
हे ही वाचा<< रवी पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ५ राशींना लक्ष्मी देणार धनलाभ? तुमची रास होणार का श्रीमंत, पाहा
वृषभ (Taurus Zodiac)
शनी शुक्र युतीने वृषभ राशीचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे. आपल्या राशीचे स्वामी मंगळ हे कर्म भावी शनिदेवांसह विराजमान होणार आहेत, त्यामुळे आपल्या राशीच्या कुंडलीत धनाढ्य योग लाभदायक ठरू शकतो. आपल्याला राशीचे सुगीचे दिवस येऊ शकतात. शनी शुक्र युती तुम्हाला अप्रत्यक्ष लाभ देऊ शकते म्हणजेच तुम्हाला थेट धनलाभ किंवा करिअरमध्ये प्रगती ऐवजी त्यापर्यंत नेणाऱ्या संधी लाभू शकतात. नोकरदार मंडळींना पगारवाढ व पदोन्नतीची सुद्धा संधी आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा व्यवसायात मोठ्या प्रगतीची संधी आहे.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यात अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)