Mahashivratri Chandra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. ज्योतिषशास्त्रात चंद्राला माता, मन, सौम्यता आणि सुंदरतेचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे चंद्राच्या गोचराचा नक्कीच शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर दिसतोच.
पंचांगानुसार, चंद्र १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. चंद्राचे हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. तसेच या दिवशी महाशिवरात्र देखील आहे ज्यामुळे हा दुर्मिळ शुभ योग खूपच भाग्यशाली ठरेल.
महाशिवरात्रीला चंद्राचे राशी परिवर्तन आर्थिक सुख देणार
कर्क (Kark Rashi)
चंद्राचा मकर राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील चढउतार थांबतील. मानसिक तणाव कमी होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
मकर (Makar Rashi)
मकर राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन मकर राशीसाठी विशेष फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा मकर राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील चंद्राचे महाशिवरात्रीला होणारे गोचर नक्कीच लाभदायक ठरेल. तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल. भौतिक सुख-सुविधा वाढतील. करिअर-व्यवसायात भरपूर यश मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. नातेसंबंध मजबूत होण्याची दाट शक्यता आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

