Mahavir Jayanti 2022: महावीर जयंती हा जैन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. जैन ग्रंथानुसार, जैन समाजातील शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशीला झाला, त्यामुळे जैन धर्मीय लोक हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करतात. भगवान महावीरांच्या आईचे नाव त्रिशाला आणि वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. भगवान महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. वयाच्या ३० व्या वर्षापासून त्यांचा अध्यात्माकडे कल होता, त्यांनी राजवाडा सोडला आणि तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.

भगवान महावीर कोण होते?
भगवान महावीरांनी अहिंसा परमो धर्माचा संदेश जगभर पसरवला. त्यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. त्यांचा जन्म बिहारमध्ये इ.स.पूर्व ५९९ मध्ये लिच्छवी घराण्याचे महाराज सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्या पोटी झाला. महावीर यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी ज्ञानप्राप्तीसाठी राजवाड्यातील सुखांचा त्याग केला होता, त्यानंतर त्यांनी तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला होता. असे मानले जाते की १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना महावीर या नावाने ओळख मिळाली.

hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी गुरुवार, १४ एप्रिल रोजी पहाटे ०४.४८ वाजता सुरू झाली आहे आणि शुक्रवार, १५ एप्रिल रोजी पहाटे ०३.५४ वाजता समाप्त होईल. या वर्षी महावीर स्वामींचा २६२० वा जन्मोत्सव आहे.

अशा प्रकारे मंदिरांमध्ये साजरी करतात महावीर जयंती
महावीर जयंतीच्या दिवशी जैन मंदिरांमध्ये महावीरजींच्या मूर्तींना अभिषेक केला जातो. यानंतर मूर्तीला रथावर ठेवून रस्त्यावर मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत जैन धर्माचे अनुयायी सक्रियपणे सहभागी होतात. तसे, हा सण भारतभर जैन समाजातील लोक साजरा करतात. पण त्याचे खास सौंदर्य गुजरात आणि राजस्थानमध्ये पाहायला मिळते. कारण या राज्यांमध्ये जैन धर्म मानणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे.

जाणून घ्या महावीर स्वामींचे सिद्धांत
महावीर स्वामींचे सर्वात मोठे तत्व म्हणजे अहिंसा. त्यांच्या प्रत्येक अनुयायाने अहिंसा, सत्य, आचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच व्रतांचे पालन करणे आवश्यक आहे. या सर्व व्रतांमध्ये अहिंसेची भावना अंतर्भूत आहे. म्हणूनच ‘अहिंसा हाच परम धर्म’ ही जैन धर्माची मुख्य शिकवण आहे. अहिंसा हे परम ब्रह्म आहे. अहिंसा हेच सुख आणि शांतीचे साधन आहे. अहिंसा हाच जगाचा उद्धारकर्ता आहे. हाच माणसाचा खरा धर्म आहे. हेच मानवाचे खरे कर्म आहे.