scorecardresearch

संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत करणार प्रवेश; १२ राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

horoscope_2-1200-1-1
मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत करणार प्रवेश; १२ राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

ज्योतिष शास्त्रानुसार १४ जानेवारी २०२२ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करणार आहेत. जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. सूर्य देव एका राशीत सुमारे ३० दिवस राहतो. सूर्य देवाचा राशीतील बदल काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ असणार आहेत. सूर्याच्या संक्रमणाचा सर्व राशींवर काय परिणाम होईल, जाणून घेऊयात.

 • मेष : सूर्याचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी चांगले राहील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. यावेळी सूर्याचा इतर तीन ग्रहांशी संयोग होईल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्य पूर्ण करू शकाल.
 • वृषभ: सूर्याचे संक्रमण तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकते. खरं तर, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि सूर्य देव यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे या काळात कामाबाबत कोणतेही नवीन प्रयोग करणे टाळावे. या काळात तुम्हाला फारसे भाग्य लाभणार नाही. वडिलांसोबतचे संबंध बिघडू शकतात. याशिवाय वडिलांची तब्येत बिघडू शकते.
 • मिथुन : या काळात तुम्हाला प्रवासादरम्यान समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे काळजी घ्या. या काळात अनेक अडचणी येऊ शकतात. जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या आईला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
 • कर्क : या राशीच्या लोकांना करिअर जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या दरम्यान तुम्हाला प्रत्येक कामात उशिरा यश मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रात आव्हानांना तोंड द्यावे लागेल.

Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला हे उपाय करून मिळवा शनि दोषापासून मुक्ती; जाणून घ्या

 • सिंह: सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीचा स्वामी आहे. संक्रमणाच्या या काळात तो तुमच्या सहाव्या भावात असेल. सूर्याच्या भ्रमणाचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी उत्तम ठरेल. सिंह राशीतही धन योग तयार होत आहेत. त्यामुळे तुम्हाला अचानक पैसेही मिळू शकतात.
 • कन्या : नोकरी आणि करिअरची चिंता आहे त्यांच्यासाठी हे संक्रमण उत्तम ठरेल. कन्या राशीच्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच अशी काही जबाबदारी मिळू शकते ज्यातून भविष्यात चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे.
 • तूळ : रवि ग्रहाच्या संक्रमणादरम्यान तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा सहभाग टाळा अन्यथा नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
 • वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये बदल आणि नवीन नोकरी मिळू शकते. या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून सूर्य आणि मंगळ ग्रह यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अपेक्षित परिणाम देईल.

Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त, स्थान आणि दान करण्याची वेळ जाणून घ्या

 • धनु: या संक्रमणादरम्यान सूर्य तुमच्या दुसऱ्या स्थानात असेल. यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. यासोबतच तुमच्या राशीत धन योगही तयार होतील. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक नफा मिळेल.
 • मकर : या राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित आजार त्रास देऊ शकतात. खाण्यापिण्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.
 • कुंभ: या राशीच्या लोकांसाठी हा योग अधिक मेहनतीचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचा खर्च अचानक वाढू शकतो. तब्येत बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या.
 • मीन: सूर्याच्या या संक्रमणामध्ये, मीन राशीच्या लोकांना आपला अहंकार बाजूला ठेवून शांतपणे आणि संयमाने आपल्या जोडीदाराशी संपर्क साधावा लागेल. या संक्रमण कालावधीत, तुम्हाला तुमच्या संबंधित कार्यक्षेत्रात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2022 at 13:25 IST