हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. वर्ष २०२२ मध्ये मकर संक्रांतीचा सण पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी म्हणजेच १४ जानेवारीला साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. मकर संक्रांत ही सर्व संक्रांतांपैकी सर्वात महत्त्वाची मानली जाते. मकर संक्रांतीला खिचडीचा सण असेही म्हणतात. या दिवसापासून देवलोक म्हणजेच स्वर्गाचा दिवस सुरू होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत असेही सांगितले आहे की, जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकर संक्रांती म्हणजेच सूर्याचा मकर राशीत प्रवेश या वर्षी दुपारी २:२९ वाजता होणार आहे. पंचांगानुसार, यावर्षी मकर संक्रांतीच्या स्नानाचा पवित्र कालावधी सकाळी ८.०५ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत राहील. सकाळी ८.०५ वाजल्यापासून निरयन उत्तरायण सुरू होणार आहे. संक्रांतीचा पवित्र काळ सूर्याच्या मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सहा तास आधी आणि सहा तासांचा असतो असे शास्त्रात सांगितले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान, सूर्यासह नवग्रहांची पूजा आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर दानधर्म सुरू करावा. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही कपडे, अन्न आणि पैसा दान करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि खिचडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दानाची वेळ सकाळी ८.०५ ते सूर्यास्तापर्यंत असेल.

या दोन राशीचे लोक येणार शनिच्या प्रभावाखाली; पुढचे अडीच वर्षे अडचणीत वाढ होण्याची शक्यता

मकर संक्रांतीचा सणही देशभरात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकर संक्रांतीला सूर्य देव उत्तरायण करतो. मान्यतेनुसार ऋतूतील बदल या दिवसापासून सुरू होतो. मकर संक्रांतीपासून हिवाळा कमी होऊ लागतो, म्हणजे शरद ऋतूच्या प्रस्थानाची वेळ सुरू होते आणि वसंत ऋतुचे आगमन सुरू होते. मकर संक्रांतीनंतरच दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनि हा सूर्याचा पुत्र असल्याचे म्हटले जाते. पण पिता-पुत्राचे नाते, त्यांच्यातील संबंध स्थिर मानले जात नाहीत. असं असताना महिनाभर सूर्य पुत्राच्या राशीत येतात. वडील एक महिना मुलाच्या घरी राहतात. सूर्याचे मकर राशीतील संक्रमण अनेक बाबतीत शुभ फल देणारे मानले जाते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti 2022 shubh muhurt snan daan timing rmt
First published on: 12-01-2022 at 09:20 IST