Malavya And Budhaditya Rajyog 2026: ५ सप्टेंबर, २०२६ हा दिवस भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवव्या दिवशी, शनिवारी येतो. हा दिवस कर्म आणि न्यायाचा स्वामी असलेल्या शनीला समर्पित आहे. या दिवशी दही-हंडी उत्सवाबरोबरच योगमाया जयंती साजरी केली जाईल. या दिवशी मृगशिरा नक्षत्र आणि आर्द्रा नक्षत्र यांची शुभ युती होत आहे. या युतीमुळे एक आकस्मिक योग निर्माण होतो, ज्यामुळे कोणतेही कार्य अनपेक्षितपणे पूर्ण होते आणि लाभ मिळतो.

या दिवशी चंद्र आणि मंगळ मिथुन राशीत युतीत असतील. यासोबतच, शुक्र आणि चंद्राचा नवपंचम योगही तयार होईल. सूर्य आणि बुध सिंह राशीत बुधादित्य योग तयार करतील. शुक्र स्वतःच्या तूळ राशीत उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार करत आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती अपरिवर्तित राहील. गुरु कर्क राशीत, शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत भ्रमण करेल. ५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या ज्योतिषीय युतींचा सर्व राशींवर लक्षणीय परिणाम होईल, परंतु हा दिवस पाच राशींसाठी वरदान ठरू शकतो.

ग्रहांचे राजयोग ‘या’ पाच राशींचे भाग्य चमकवणार

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींच्या लोकांना ग्रहांच्या राजयोगाचा खूप फायदा होईल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांना या राजयोगाचा शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

सिंह (Singh Rashi)

या राजयोगाचा प्रभाव सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

तूळ (Tula Rashi)

५ सप्टेंबर रोजीची ग्रहस्थिती तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र, या दिवशी अत्यंत फलदायी मालव्य राजयोग तयार करत आहे. या शुभ योगामुळे सुखसोयी आणि ऐश्वर्यात वाढ होईल. व्यावसायिकांना भागीदारीतून फायदा होईल. करिअरमधील प्रगतीला गती मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध अधिक गोड होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीसाठी हा काळ खूप खास ठरू शकतो, कारण कर्म देणारा शनी तुमच्या राशीत वक्री आहे, ज्यामुळे अनपेक्षित यश मिळेल. तुमची जुनी, प्रलंबित कामे या दिवशी नवीन गती घेऊ शकतात. मृगशिरा आणि आर्द्रा नक्षत्रांच्या प्रभावामुळे अनपेक्षित किंवा अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक मालमत्तेचे वाद मिटण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आणि आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)