Mahalaxmi Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो, शिवाय त्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो. चंद्र आणि मंगळाच्या युतीने हा राजयोग निर्माण होत आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते.

पंचांगानुसार, सध्या मंगळ कुंभ राशीत विराजमान असून चंद्रदेव देखील याच राशीत विराजमान आहेत. ज्यामुळे ‘महालक्ष्मी राजयोग’ निर्माण झाला आहे. शिवाय कुंभ राशीत सध्या बुध आणि राहूदेखील आहेत. दरम्यान, अवघ्या काही तासानंतर चंद्रदेव कुंभ राशीतून मीन राशीत गोचर करतील. १८ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रदेव मीन राशीत जाताच महालक्ष्मी राजयोग समाप्त होईल. दरम्यान, उरलेले हे काही तास काही राशींच्या लोकांसाठी खूप लाभकारी आहे.

महालक्ष्मी राजयोग ‘या’ तीन राशींना करोडपती बनवणार

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग खूप खास ठरेल. हा शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

धनु (Dhanu Rashi)

महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी महालक्ष्मी योगाचा प्रभाव खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)