Mangal And Chandra Yuti Make Mahalaxmi Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात याचा प्रभाव ग्रहाच्या स्थानानुसार शुभ- अशुभ दिसून येतो. जेव्हा काही ग्रह गोचर कुंडलीत विशिष्ट स्थानी येतात तेव्हा त्यातून काही महायोग किंवा राजयोग तयार होत असतात. त्यापैकी एक म्हणजे महालक्ष्मी राजयोग. हा एक अत्यंत शुभ योग मानला जातो, जो मंगळ आणि चंद्र यांच्या युतीने तयार होतो. १४ मे रोजी हे दोन्ही ग्रह मेष राशीत एकत्र येतील आणि १६ मे पर्यंत तेथेच राहतील. या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल, याबद्दल जाणून घेऊयात…

मेष

तुमच्यासाठी हा राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि मोठी जबाबदारीही दिली जाऊ शकते. जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी हा एक उत्तम काळ ठरणार आहे.

मिथुन

तुमच्यासाठी हा राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. समाजात तुमचा मान वाढेल, व्यावसायिकांचा एक मोठा करार निश्चित होऊ शकतो. सुख-सुविधा आणि आराम वाढेल, नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

तुमच्यासाठी शुभ योग अत्यंत चमत्कारिक ठरेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील, आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून पैसा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे.

तूळ

तुमच्यासाठी हा राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. तुमच्या सुखसोयी आणि आरामात वाढ होईल आणि तुमच्या बँक खात्यातील शिल्लकही लक्षणीयरीत्या वाढेल. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते.प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रचंड पाठिंबा मिळेल. तुम्ही जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता आणि गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळणे अपेक्षित आहे.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)