Mangal Ashlesh Nakshtra Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह हा धैर्य, ऊर्जा, शौर्य, भूमी व संपत्तीसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. त्याला ग्रहांचा सेनापती असेही म्हटले जाते. १७ ऑक्टोबर २०२६ पासून म्हणजेच उद्यापासून मंगळ आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आणि १२ नोव्हेंबरपर्यंत तिथेच राहील. मंगळाचे हेच संक्रमण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानले जाते. तर याच ग्रहांच्या हालचालींचा वेगवेगळ्या राशींवर परिणाम होऊ शकतो. यादरम्यान काही राशींना आर्थिक दिलासा, कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि व्यवसायात यश मिळू शकते. मंगळाच्या आश्लेषा नक्षत्रातील प्रवेशामुळे कोणत्या चार राशींना फायदा होण्याची शक्यता चला जाणून घेऊ.

मेष

तुम्हाला या काळात कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळू शकतात. दीर्घकाळ रखडलेल्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्न वाढण्याच्या संधीही निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे जबाबदाऱ्या पार पाडणे सोपे जाईल.
गुंतवणुकीच्या निर्णयामुळे नफा मिळू शकतो. पण, गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कायदेशीर विवादांमध्येही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क

आर्थिक गोष्टींमध्ये हा काळ अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
दीर्घकालीन प्रयत्नांमुळे महत्त्वपूर्ण यश मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याचे संकेत आहेत.
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतूनही नफा मिळू शकतो. याव्यतिरिक्त, परदेश प्रवासाच्या किंवा परदेशाशी संबंधित कामाच्या संधी निर्माण होऊ शकतात.
तसेच आर्थिक योजना आखताना माहितीपूर्ण निर्णय घेणे चांगले राहील.

वृश्चिक

मंगळाचे संक्रमण करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले करू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा अधिक चांगल्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नातील वाढ आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या संधीही घेऊन येईल. जे आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहेत, त्यांना नवीन शक्यता शोधण्याची संधी मिळू शकते. तसेच इच्छित नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पण, कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी व्यावहारिक बाबींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

मकर

तुम्हालाकामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळू शकते. सुधारलेली आर्थिक परिस्थिती जुन्या कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत करू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना देखील पुढे जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होण्याची आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरू शकतो. परदेशात नोकरीची तयारी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. संयमाने आणि योग्य नियोजनाने पुढे जाणे फायदेशीर ठरेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)