Graha Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर अधिक स्पष्ट पाहायला मिळतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी २०२६ या नवीन वर्षाला सुरूवात झाली असून या महिन्यात बऱ्याच ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळाले. दरम्यान, आता पुन्हा एकदा काही ग्रहांचे एकामागे एक असे नक्षत्र परिवर्तन होताना पाहायला मिळेल.

पंचांगानुसार, जानेवारी २०२६ महिन्याच्या शेवटी ४ ग्रह दुर्लभ संयोग निर्माण करणार आहेत. ज्यात मंगळ, शुक्र, बुध आणि गुरू या ग्रहांचा समावेश आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४६ मिनिटांनी मंगळ उत्तराषाढा नक्षत्रातून श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल. ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ५३ मिनिटांनी गुरू पुनर्वसु नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून पहिल्या चरणात जाईल आणि ३१ जानेवारी रोजी बुध आणि शुक्र एकाच नक्षत्रात गोचर करेल. बुध ग्रह पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी आणि शुक्र संध्याकाळी ५ वाजून ४२ मिनिटांनी धनिष्ठा नक्षत्रात जाईल. ग्रहांच्या या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा काही राशींवर पडेल.

‘या’ राशींवर नक्षत्र परिवर्तनाचा शुभ प्रभाव

मकर (Makar Rashi)

मकर राशीसाठी चार ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाचा खूप सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील ग्रहांचे नक्षत्र गोचर खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या लोकांसाठी देखील ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)