Mangal Nakshatra Transit 2024: ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह शक्ती, शस्त्र आणि शूरतेचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह जसे राशीपरिवर्तन करत असतात. तसे ते नक्षत्रातूनही गोचर करत असतात. १६ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सूर्य एका वर्षानंतर त्याच्या स्वत:च्या राशीमध्ये म्हणजेच सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच आताच्या घडीला नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह नक्षत्र बदलही करणार आहे. आज १६ ऑगस्टला मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळाच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींचं नशीब उजळणार? जाणून घेऊया.

‘या’ राशींचं नशीब उजळणार?

वृषभ राशी (Taurus Zodiac)

मंगळाच्या नक्षत्र बदलाने वृषभ राशीच्या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो.

(हे ही वाचा : ९ दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? बुधदेवाचे महागोचर होताच वाईट दिवस संपून धनलाभासह मिळू शकते नशिबाला कलाटणी )

मिथुन राशी (Gemini Zodiac)

मंगळाच्या नक्षत्र बदलाने मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो आणि गुंतवणुकीतही तुम्हाला आर्थिक नफा मिळू शकतो. जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. राजकारणी लोकांना मोठे यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. 

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

मंगळाच्या नक्षत्र बदलाने वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कामात तुमचा सहभाग वाढू शकतो. तसेच व्यवसायिकांना सुद्धा चांगला धनलाभ होऊ शकतो. तसेच जी मंडळी रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांना येत्या काळात आर्थिक स्रोत वाढल्याचे जाणवू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि गुंतवणुकीसाठी उत्तम काळ राहू शकतो.

कुंभ राशी  (Aquarius Zodiac)

मंगळाच्या नक्षत्र बदलाने कुंभ राशी लोकांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळून धनलाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. तुम्ही करत असलेल्या तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळू शकतो. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. या लोकांच्या आयुष्यात मनासारखा जोडीदार येऊ शकतो. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)