Mars Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ४५ दिवसांनी राशिबदल करतो. मंगळ हा भूमी, शौर्य, वीरता व रक्त या घटकांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होते तेव्हा तेव्हा त्याचा सर्व क्षेत्रांवर विशेष परिणाम दिसून येतो. त्यात मंगळ जुलै महिन्यात वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींना मालमत्ता आणि नोकरी-व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. चला तर मग, या भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊ…

कन्या

मंगळाचा राशिबदल कन्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते; तसेच व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतो. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या नेतृत्वक्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्ही देश-विदेशांत प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते.

हेही वाचा – २५ जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी; जाणून शुभ मुहूर्त, पूजेची वेळ अन् तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ ठरू शकते. कारण- मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. मान-सन्मान, प्रतिष्ठा व कीर्तीमध्येही चांगली वाढ होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबरच्या नात्यात अधिक आनंद टिकवून राहू शकता. मंगळ तुमच्या राशीच्या आठव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला संशोधनकार्यात चांगले यश मिळू शकते. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगली प्रगती साधता येऊ शकते. त्याशिवाय त्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो; तसेच इतर व्यवसायांत गुंतवणुकीची संधी मिळू शकते.

हेही वाचा – २०२५ मध्ये बुधादित्य राजयोग; ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत! बुध, सूर्यदेवाच्या कृपेने सर्व अडचणी होणार दूर?

कुंभ

मंगळाचा राशिबदल कुंभ राशीसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात तुम्ही भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकता. त्याच वेळी नोकरदार लोकांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यासह त्यांना नोकरीत नव्या किंवा वरच्या पदावर स्थान मिळू शकते. हा काळ तुमच्यासाठी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी चांगला मानला जातो. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. त्याचबरोबर ज्या लोकांचा व्यवसाय रिअल इस्टेट, प्रॉपर्टी यांच्याशी संबंधित आहे त्यांना चांगला लाभ मिळू शकतो.