Mangal Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच ठरविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो. मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रात साहस, पराक्रम आणि ऊर्जेचा कारक ग्रह मानले जाते, त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो, अशा व्यक्तींना आयुष्यात नेहमी मंगळाचे शुभ परिणाम पाहायला मिळतात. ऑगस्ट महिन्यामध्ये मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश झाला असून तो या राशीत ऑक्टोबरपर्यंत राहील. याचदरम्यान १६ सप्टेंबर रोजी मंगळाचे अंशबळ १२ डिग्रीपर्यंत होणार आहे. अंशबळामध्ये मंगळ पूर्णपणे युवा अवस्थेत येईल.
मंगळाची ही स्थिती काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.

वृषभ

मंगळाचे अंशबळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक आर्थिक लाभ देणारे असेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम काळ सिद्ध होईल. व्यवसायात अधिक वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आकस्मिक धनलाभाचे योग निर्माण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तुमच्यात साहस निर्माण होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मुलांकडून सुख मिळेल. तुमच्या मानसन्मात वाढ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे अंशबळ अत्यंत शुभ ठरेल. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती खूप चांगली राहील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबीयांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल. या काळात तुमच्यात साहस, पराक्रम निर्माण होईल.

हेही वाचा: तब्बल ३० वर्षांनंतर शनी-सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे बदलणार आयुष्य

धनु

मंगळाचे अंशबळ धनु राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. करिअरसह व्यवसायातही वाढ होईल. कुटुंबीयांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत उच्च पद प्राप्त होईल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)