Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्रबदल करतात; ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे दिसून येते. त्यात १२ एप्रिल २०२५ रोजी मंगळ शनीच्या नक्षत्रात प्रवेश करील. सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी मंगळ शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे मंगळ-पुष्य योग तयार होईल. मंगळाच्या नक्षत्रबदलामुळे काही राशींच्या लोकांसाठी सोन्याचे दिवस सुरू होऊ शकतात. तसेच या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. चला जाणून घेऊ या भाग्यवान राशी कोणत्या ते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्या

मंगळाचा नक्षत्रबदल कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात या लोकांना वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीशी संबंधित नवीन संधी मिळू शकतात. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. तसेच करिअरमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या तुमच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतात. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील. तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखकर असेल.

मीन

मंगळाच्या नक्षत्रातील बदल मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. यावेळी मीन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर आणि भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना विशेष फायदे मिळू शकतात आणि अनावश्यक खर्च कमी करता येऊ शकतो. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. या काळात नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ योग आहे. तुमच्या आयुष्यात ऐषारामाची साधने वाढतील. यावेळी तुम्ही एखादे आलिशान वाहन किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. तुम्हाला कामानिमित्त प्रवासाची संधी मिळू शकते. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना काही परीक्षांत यश मिळू शकते.

कर्क

मंगळाचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळाच तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. प्रेमी जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. एकंदरीत हा काळ सर्व बाबतीत उत्तम राहील. त्याच वेळी व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात; ज्यातून ते चांगला नफा कमावू शकतात. तसेच, या काळात एक मोठा व्यवसाय करार होऊ शकतो, जो तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरू शकतो.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)