Mangal Gochar 2026 : गेल्या १८ सप्टेंबरच्या संध्याकाळी मंगळ ग्रहाने चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश केला आहे. हे गोचर अजूनही सक्रिय आहे. यापूर्वी मंगळ मिथुन राशीत होता. आता कर्क राशीत मंगळ १२ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे म्हणजेच या गोचराचे अजूनही ४० दिवस बाकी आहेत. या काळात एकूण ६ राशींच्या व्यक्तींना मोठा आर्थिक आणि व्यावसायिक फायदा होईल.
याच गोचरासह ‘गुरू-मंगळ योग’देखील तयार होत आहे. वैदिक ज्योतिषात याला ‘नीचभंग राजयोग’ म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे कर्क राशीमध्ये गुरू ग्रह आधीपासूनच उपस्थित आहे. मंगळ या राशीत नीच स्थानी असतो; तर गुरू उच्च स्थानी असतो. त्यामुळेच हा दुर्मीळ राजयोग तयार होत आहे.
या ज्योतिषीय घटनेचा थेट फायदा मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक या राशींच्या व्यक्तींना मिळत आहे. या राशींवर ग्रहांच्या स्थितीचा कसा प्रभाव पडेल, ते सविस्तर पाहूया:
१. मेष
प्रोफेशनल लाईफमध्ये सकारात्मक बदल घडतील. करिअरमधील प्रगती निश्चित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे कामाला योग्य दिशा मिळू शकेल. कौटुंबिक आयुष्यही हळूहळू सुकर होईल आणि आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते.
२. वृषभ
मंगळाच्या या गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना अनेक लाभ मिळतील. नोकरदार वर्गाला चांगल्या कंपनीकडून नवीन ऑफर येऊ शकते. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असाल, तर या काळात यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. भाग्याची पूर्ण साथ लाभेल.
३. सिंह
परदेशात जाण्याचे उत्तम योग बनत आहेत. अचानक धनलाभाची शक्यता निर्माण होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय आता पूर्ण स्पष्टतेने घेऊ शकाल. मंगळाचे हे भ्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी केवळ आणि केवळ फायदेशीर ठरेल.
४. कन्या
या गोचराचा कन्या राशीच्या लोकांवर अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसेल. पुढील ४० दिवसांत आर्थिक स्थिती मजबूत करणाऱ्या अनेक चांगल्या संधी मिळतील. धनलाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळाल्याने तुमची प्रोफाईल आणि छाप अधिक मजबूत होईल.
५. तूळ
या गोचरामुळे तूळ राशीच्या लोकांना दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमधील वातावरण आणि स्थिती सुधारेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि पाठिंबा देतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे काम करण्यात उत्साह राहील. या काळात तुमच्यातील नेतृत्वगुण अधिक उजळून निघतील.
६. वृश्चिक
मंगळ गोचरामुळे वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक घडी मजबूत होणार आहे. नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा कामात मोठी वाढ होईल. एखादी अतिशय आनंदाची बातमी कानावर पडू शकते. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. त्याशिवाय जमीन-जुमला, घर आणि वाहनाशी संबंधित कामे वेगाने पुढे जातील.
