Mangal Gochar 2026 Impact: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला धाडस, ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारक मानले जाते. १६ जून रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी मंगळ कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल आणि ५ जुलैपर्यंत याच नक्षत्रात राहील. या ग्रहाचे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण याचा प्रभाव सर्व १२ राशींवर वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येईल. या २० दिवसांच्या कालावधीत काही राशींसाठी करिअरमधील प्रगती, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि वैयक्तिक संबंधांमध्ये सकारात्मक बदलांचे योग निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे.

मेष राशी:

मंगळाचे कृत्तिका नक्षत्रातील गोचर मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ संकेत देत आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात आणि शारीरिक ऊर्जेत प्रचंड वाढ होईल. नोकरदार वर्गाला पदोन्नती (Promotion) किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात अचानक धनलाभ किंवा एखादी मोठी सुवर्णसंधी मिळू शकते. बऱ्याच काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील आणि जीवनात मोठ्या यशाचे योग येतील.

सिंह राशी:

सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ सौभाग्य आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. अडकलेली कामे सहज पूर्ण होतील आणि जोडीदार किंवा कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडे तुमचा ओढा वाढेल. कार्यक्षेत्रात तुमची नेतृत्वक्षमता अधिक मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक बाजू बळकट होईल.

वृश्चिक राशी:

मंगळाचे हे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास घेऊन येईल. मात्र, या काळात घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. अचानक धनलाभाचे योग येत असल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैयक्तिक संबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः अनुकूल राहील.

मीन राशी:

मीन राशीसाठी हा गोचर शुभ बदल घडवून आणणारा ठरेल. तुमच्या उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये प्रगतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात पदोन्नतीचे योग येतील, विशेषतः परदेशाशी संबंधित कामांमध्ये उत्तम लाभ मिळू शकतो. आरोग्यात सुधारणा होईल आणि जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)