Mars Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ कन्या राशीत विराजमान असून उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये विराजमान आहे.
पंचांगानुसार, २१ जून ते २ ऑगस्ट या कालावधीत मंगळ ग्रह वृषभ राशीत स्थित असेल. या काळात, ५ जुलै २०२६ रोजी मंगळ – जो धैर्य, ऊर्जा आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो – रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि २४ जुलै २०२६ पर्यंत तिथेच राहील. रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. जेव्हा अग्नी तत्त्वाशी संबंधित असलेला मंगळ ग्रह चंद्राच्या अधिपत्याखालील या सौम्य आणि समृद्धी देणाऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा आक्रमक स्वभाव काहीसा शांत होऊन त्याचे रूपांतर व्यावहारिक आणि दृढ स्वभावात होते. करिअर, आर्थिक लाभ आणि मालमत्तेशी संबंधित बाबींसाठी हे गोचर अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
मंगळाचे गोचर ‘या’ राशींचे भाग्य बदलणार
कन्या (Kanya Rashi)
मंगळाचे नक्षत्र परिवर्तन प्रवेश कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
धनु (Dhanu Rashi)
मंगळाचे गोचर परिवर्तन धनु राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील.
सिंह (Singh Rashi)
मंगळाच्या गोचराने सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
