Mangal Gochar: ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ सध्या चंद्राच्या कर्क राशीत गोचर करत असून तो १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत या राशीत राहणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि रागाचा कारक ग्रह मानला जातो, तर चंद्र मन आणि भावनांचा कारक आहे. कर्क ही जलतत्त्वाची रास आहे.

पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, मंगळ जेव्हा जलतत्त्वाच्या कर्क राशीत गोचर करतो, तेव्हा हा काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. कारण कर्क ही मंगळाची नीच रास आहे. मात्र मंगळ आणि चंद्र यांच्यात मैत्रीचे संबंध मानले जातात. कुंडलीत मंगळ आणि चंद्र यांचा शुभ संबंध असेल, तर चंद्र-मंगळ योग तयार होतो. हा योग लक्ष्मी योग म्हणून ओळखला जातो.

कर्क राशीतील मंगळ काही राशींच्या लोकांना आर्थिक भरभराट आणि व्यवसायात यश मिळवून देऊ शकतो. तसेच या काळात चंद्र आणि मंगळाच्या प्रभावामुळे मानसिकदृष्ट्याही बळ मिळू शकते. जाणून घेऊया, कर्क राशीतील मंगळ कोणत्या राशींना शुभ फळ देणार आहे.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांच्या धन-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीसह उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. नवीन मार्गांनी धनलाभ होईल, तसेच जुन्या मार्गातूनही पैसा मिळू शकतो. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर लाभदायक ठरू शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले किंवा थकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. प्रवास फायदेशीर ठरतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. वडिलांचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. नशिबाची साथ मिळेल.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांची व्यावसायिक स्थिती अधिक चांगली होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेण्यात यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होऊ शकते. नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल आणि कामात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. प्रवास लाभदायक ठरतील.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पितृसंपत्तीमधूनही फायदा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबात वाढ किंवा आनंदाचे वातावरण राहू शकते. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. मानसिक तणाव कमी होईल आणि भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ जाणवेल.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना कर्क राशीतील मंगळाचे गोचर भाग्याची साथ देऊ शकते. महत्त्वाचे निर्णय यशस्वीपणे घेता येतील. प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात येण्याची शक्यता असून त्याचा करिअरमध्ये फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील अडचणी हळूहळू दूर होतील. उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य समतोल राखण्यात यश मिळेल, त्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळेल. एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)