scorecardresearch

‘या’ राशींना होळीनंतर ४ दिवसातच मिळेल बक्कळ पैसा? मंगळ राशी बदलताच लाभू शकते श्रीमंती

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो

Mangal Gochar
मंगळाच्या प्रभावामुळे काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. मार्च २०२३ मध्ये अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे, ज्यात मंगळ ग्रहाचाही समावेश आहे. मंगळ ग्रह हा शौर्य, धाडस आणि जमीन इत्यादींचा कारक मानला जातो. मंगळ ग्रह मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी आहे. कुंडलीत मंगळाची स्थिती शुभ असते तेव्हा तो उच्च स्थानावर विराजमान असतो.

मार्चमध्ये कधी होणार मंगळ गोचर ?

मंगळाचे राशी परिवर्तन १३ मार्च २०२३ रोजी सोमवारी सकाळी ५ वाजून ३३ मिनिटांनी होणार आहे. या दरम्यान मंगळ वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करेल.

हेही वाचा- ‘लक्ष्मी योग’ बनल्याने ‘या’ राशींचे भाग्य चमकणार; २०२३ वर्षभर मिळणार बक्कळ धनलाभाची संधी

मंगळ गोचरचा ‘या’ राशींना होणार फायदा

मंगळाच्या राशी बदलाचा परिणाम मेष राशीपासून मीन राशीपर्यंत होणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. तर त्या शुभ राशी कोणत्या आहेत? ज्यांना मंगळाच्या प्रभावामुळे चांगले दिवस येण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊया.

वृषभ – मंगळ ग्रहाचे गोचर वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घेऊन येईल. मंगळ गोचर या राशीतील लोकांच्या कुंडलीच्या दुसऱ्या स्थानी प्रवेश करेल. ज्याला धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. गोचर काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभाचे योग होण्याची शक्यता आहे. शिवाय अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊन ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळतील यासह तुम्ही प्रभावशाली लोकांच्या संपर्कातही येऊ शकता.

हेही वाचा- २०२३ Valentine पासून ‘या’ राशींना मिळणार अमाप प्रेम? १४ फेब्रुवारीनंतर पार्टनरमुळे उजळेल भाग्य

तूळ – मंगळाचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मंगळ ग्रहाचे गोचर तुमच्या राशीच्या नवव्या स्थानी प्रवेश करेल. जे भाग्य आणि परदेश प्रवासाचे ठिकाण मानले जाते. या दरम्यान तुम्हाला तुमचे नशीब साथ देईल. अडकलेले पैसे मिळू शकतात, तसंच करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात फायदा होण्यासह घरामध्ये शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण खूप शुभ आणि लाभदायक असणार आहे. करिअर आणि व्यवसायामध्ये या राशीच्या लोकांना मोठे यश मिळू शकते. तर नोकरीत नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकतो. यासह कुटुंबात आनंदाचे वातावरण आणि आरोग्यही चांगले राहू शकते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 10:20 IST