Mangal Rashi Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. पंचांगानुसार, मंगळ ०२ ऑगस्ट रोजी जवळपास रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल, जो १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत याच राशीत राहील. मंगळाचे हे गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकेल.
मंगळाचे गोचर भाग्य बदलणार
मेष (Mesh Rashi)
मंगळाचे राशी परिवर्तन प्रवेश मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
कन्या (Kanya Rashi)
मंगळाचे राशी परिवर्तन कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील.
तूळ (Tula Rashi)
मंगळाचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, तर व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदारासोबतचे मतभेद कमी होतील. समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या कामामुळे प्रसिद्धी मिळण्याची संधी निर्माण होईल.
मकर (Makar Rashi)
मंगळाचे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि आर्थिक लाभाचे योग निर्माण होतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असून पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. वैवाहिक आणि प्रेमजीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढल्यामुळे प्रतिष्ठा उंचावू शकते.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक शुभ संधी घेऊन येऊ शकतो. पैशांशी संबंधित अडचणी कमी होतील आणि गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची ओळख आणि प्रसिद्धी वाढेल. प्रेमसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढेल, तसेच अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. नशीबाची साथ मिळाल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
