Mangal Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. त्यानुसार या परिवर्तनाचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. तर सर्वच राशींवर बरा वाईट परिणाम हा काही प्रमाणात होतो. ज्यांच्या राशीला मंगळ असतो पण तो शुभ स्थितीत असतो, त्यांना याचा फायदा होतो. कारण त्यामुळे या व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम असतात.

दरम्यान, मंगळाचेही वृश्चिक राशीत भ्रमण झाले आहे. आता डिसेंबरमध्ये मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. मंगळाचे वृश्चिक राशीच भ्रमण खूप विशेष आहे. कारण ती मंगळाची स्वत:ची रास आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीवर राज्य करतो. ७ डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. हे मंगळाचे या वर्षातले शेवटचे भ्रमण असेल. त्यानंतर नवीन वर्षात मंगळ थेट राशीच बदलणार आहे. १६ जानेवारी २०२६ रोजी मंगळ शनीच्या मकर राशीत प्रवेश करेल. मंगळ मकर राशीच वरच्या स्थानी मानला जातो. यामुळे अद्वितीय समीकरणे तयार होतील आणि अनेक राशींवर परिणाम होईल. मंगळाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती वादग्रस्त असतात असे म्हटले जाते. मंगळ सूर्य, चंद्र आणि गुरूसाठी चांगला आहे, मात्र त्याचे बुध आणि केतूशी संगनमत होत नाही. तो शनीपासून देखील अंतर राखतो. या मंगळाच्या संक्रमणाचा राशींवर काय परिणाम होतो ते जाणून घेऊ…

मेष ते सिंह राशींवर होणारा प्रभाव

मंगळाने मेष राशीच्या आठव्या घरात प्रवेश केला आहे, त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित संपत्ती मिळू शकते. तसंच तुम्हाला विशिष्ट विषयातही यश मिळेल. एकूणच हे संक्रमण मेष राशीसाठी फायदेशीर ठरेल.

मंगळ वृषभ राशीच्या सातव्या घरात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विवाहात अडचणी निर्माण होतील. प्रेम जीवनात आणि व्यवसायात समस्या निर्माण होतील. सध्या कोणाशीही कठोर शब्दात बोलणे टाळा.

मंगळ मिथुन राशीच्या सहाव्या घरात आहे. तेव्हा तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी हे फायदेशीर नाही. काही लोकांना रक्तदाब किंवा पोटाच्या समस्या येऊ शकतात.

मंगळ कर्क राशीच्या पाचव्या घरात आहे. त्यामुळे अपत्य प्राप्ती, क्रिएटिव्हिटी आणि प्रेम जीवनात तीव्रता येईल.

मंगळ सिंह राशीला भरपूर फायदा देईल. घर, वाहन आणि मालमत्तेशी संबंधित चांगले निर्णय घेता येतील, मात्र कुटुंबात काही समस्या उद्भवू शकतात.

कन्या ते मीन राशींवर होणारा प्रभाव

मंगळ कन्या राशीच्या लोकांना धैर्य देईल, बळ वाढवेल. पोलीस किंवा क्रीडा व्यवसाय असलेल्यांसाठी हा चांगला काळ आहे.

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक चढ-उतारीचा असेल. बोलण्यात कठोरता असेल. शहाणपणाने गुंतवणूक करा.

वृश्चिक राशीच्या लोकांना जीवनात आत्मविश्वास मिळेल आणि आयुष्यात एक नवीन सुरूवात होईल आणि मोठा बदल होईल.

धनु राशीच्या लोकांना मंगळाच्या प्रभावामुळे परदेश प्रवास करावा लागेल, खर्च वाढेल. झोपेचा अभाव असू शकतो.

मकर राशीच्या लोकांना मंगळामुळे समाजिक संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे, तसंच करिअर वाढीसाठी हा एक उत्तम काळ आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे आणि नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे.

मीन राशीच्या लोकांचं नशीब उजळेल आणि प्रवासाचीही शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)