Mangal Gochar Till 12 November 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला धैर्य, ऊर्जा, शौर्य, जमीन, संपत्ती आणि आत्मविश्वासाचा कारक मानले जाते. कुंडलीत मंगळ कोणत्या स्थानावर आहे, याचा परिणाम व्यक्तीच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनावर होतो, असे मानले जाते. त्यामुळे मंगळाच्या राशीतील बदलांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

मंगळ सध्या कर्क राशीत आहे आणि हे गोचर १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, या काळात चार राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यांना नोकरीत बढती, नवीन व्यवसायाच्या संधी, सुधारलेली आर्थिक परिस्थिती आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकते. चला पाहूया की, मंगळाचे गोचर कोणत्या राशींसाठी शुभ असणार आह ते.

मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. तर कर्क राशीत मंगळाची स्थिती कमकुवत मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात व्यक्ती अधिक भावनिक होऊ शकतो आणि निर्णय घाईघाईने घेण्याची शक्यता सुद्धा दिसते आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करणे महत्त्वाचे मानले जाते.

पण, या गोचराचा वेगवेगळ्या राशींवर होणारा परिणाम त्यांच्या कुंडलीतील मंगळाच्या स्थितीवर आणि इतर ग्रहांच्या प्रभावावर अवलंबून असू शकतो.

मेष

करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी समन्वय सुधारल्याने भविष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात.

वृश्चिक

तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडताना दिसतील. मंगळ हा तुमच्या राशीचा अधिपती ग्रह आहे, त्यामुळे या गोचराचा प्रभाव विशेष मानला जातो. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात आणि जुन्या व्यावसायिक संबंधांचा फायदा होण्याचीही शक्यता आहे.

धनु

मंगळाचे गोचर तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये दिलासादायक ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामासाठी ओळख मिळू शकते. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता देखील आहे.

मीन

मंगळाचे गोचर तुमच्या जीवनात सकारात्मक संधी घेऊन येऊ शकते. आर्थिक दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. व्यवसायातील नफा वाढू शकतो आणि नवीन प्रकल्पावर काम सुरू होऊ शकते.

मंगळाचे पुढील राशी परिवर्तन केव्हा होईल?

पंचांगानुसार, मंगळ १८ सप्टेंबर २०२६ रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. आता, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी , मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कर्क राशीतील मंगळाच्या गोचराचा शेवट होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाला धैर्य, शौर्य, जमीन, संपत्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे, त्याच्या राशी परिवर्तनाचा परिणाम करिअर, कौटुंबिक जीवन, मालमत्ता आणि आर्थिक निर्णयांवर होतो. पण, कोणत्याही गोचराचे वास्तविक परिणाम व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतात हेही लक्षात ठेवा.