Mangal Graha Uday 2026: ज्योतिषशास्त्रात, मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. नऊ ग्रहांमध्ये मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. तो ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन आणि अस्त, मार्गी, उदय देखील होतो.

पंचांगानुसार, मंगळ ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी अस्त झाला असून ०२ मे २०२६ रोजी सकाळी ०४ वाजून ३० मिनिटांनी उदय होईल. मंगळ १८२ दिवसानंतर उदय स्थितीत आला आहे. मंगळाची ही स्थिती काही राशींसाठी लाभदायी असेल.

मंगळाचा उदय ‘या’ राशींचे नशीब चमकवणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचा उदय स्थिती खूप लाभकारी ठरेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये भरपूर वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाची उदय स्थिती शुभ फळ देणारी असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची उदय स्थिती लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचा उदय अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही अवस्था खूप फायदेशीर ठरेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)