Mangal Udya 2026: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. नऊ ग्रहांमध्ये मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. तो ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन आणि अस्त, मार्गी, उदय देखील होतो.

पंचांगानुसार, मंगळ १२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी अस्त झाला असून १३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी मंगळाचा उदय होईल. २०२६ मध्ये मंगळ १०२ दिवस अस्त राहिल्यानंतर पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत येईल. ज्याचा शुभ प्रभाव नक्कीच काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

मंगळाचा उदय ‘या’ राशींना मालामाल करणार

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही अवस्था खूप फायदेशीर ठरेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक मोठे आणि चांगले बदल पाहायला मिळतील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. कामात भरपूर गती मिळेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल.

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती खूप लाभकारी ठरेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये भरपूर वाढ होईल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाची उदय स्थिती शुभ फळ देणारी असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)