Mangal Guru Dwidwadash Drushti Yog 2026: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला विशेष महत्त्व आहे. ग्रह जेव्हा विशिष्ट स्थितीत येतात, तेव्हा त्यातून विविध योग तयार होतात आणि त्याचा प्रभाव राशींवर दिसून येतो असे मानले जाते. १ सप्टेंबर २०२६ रोजी मंगळ आणि गुरु एकमेकांपासून ३० अंशांवर येत ‘द्विद्वादश दृष्टी योग’ तयार करणार आहेत. मंगळ हा शौर्य, साहस आणि शारीरिक ऊर्जेचा कारक मानला जातो, तर गुरु ज्ञान, भाग्य आणि विस्ताराचा कारक मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या भावात स्थित असतात, तेव्हा द्विद्वादश योग तयार होतो. हा योग काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत प्रभावी राहू शकतो. या काळात काही राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.

नेमका कधी तयार होणार द्विद्वादश दृष्टी योग?

मंगळ आणि गुरु १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी एकमेकांपासून ३० अंश अंतरावर येणार आहेत. त्यामुळे द्विद्वादश योगाची निर्मिती होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगाचा विशेष लाभ चार राशींना मिळू शकतो. या राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळण्यासोबतच करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात.

मेष राशी: करिअरमध्ये मोठी संधी मिळणार

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ-गुरुचा द्विद्वादश योग शुभ ठरू शकतो. या काळात करिअरमध्ये महत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात आणि भाग्याची साथ लाभू शकते. वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल दिसू शकतात. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होऊन अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी: मेहनतीला मिळणार यशाची पावती!

सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारा ठरू शकतो. करिअरमध्ये वेगाने प्रगती होण्याची शक्यता असून आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. अडचणींवर मार्ग काढण्याची क्षमता वाढेल.

धनु राशी: अचानक मिळू शकतो मोठा फायदा!

धनु राशीसाठी द्विद्वादश योग अत्यंत शुभ ठरू शकतो. या काळात आयुष्यात काही अनपेक्षित आणि सकारात्मक बदल घडू शकतात. परदेशात नोकरी किंवा काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. नातेसंबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. याशिवाय आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढू शकतो. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.

मीन राशी: पैसा, प्रतिष्ठा अन् व्यवसायात प्रगती!

मीन राशीच्या लोकांसाठी हा योग अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. पैतृक संपत्तीशी संबंधित प्रकरणातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि मोठ्या आर्थिक फायद्याचे मार्ग खुले होऊ शकतात. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढू शकते आणि अभ्यासात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आयुष्यात काही सुखद आणि सकारात्मक बदल घडताना दिसू शकतात.