Mangal Nakshatra Parivartan 2026 : २४ जुलै २०२६ रोजी मंगळ ग्रह स्वतःच्या मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मृगशिरा ग्रहाचा स्वामी स्वतः मंगळ आहे, त्यामुळे या गोचराचे परिणाम नेहमीपेक्षा अधिक शक्तिशाली मानले जातील. ज्योतिषांच्या मते, जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याचे शुभ परिणाम वाढतात. मंगळ हा धैर्य आणि ऊर्जेचा घटक असल्याने, त्याचा शुभ प्रभाव काही राशींना नेतृत्व कौशल्ये आणि सकारात्मक आर्थिक परिणाम देऊ शकतो. करिअरमध्ये सुधारणा, आर्थिक लाभ, रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणे, यश मिळण्याची दाट शक्यता दिसते आहे. चला या राशींबद्दल जाणून घेऊयात…

मेष

तुमच्या आयुष्यात उत्साह व नवीन संधी येऊ शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नोकरी व व्यवसायातील कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ मिळू शकते. कामासंबंधित प्रवास शक्य आहे. प्रवास फायदेशीर ठरू शकतात. हा काळ कला क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल.

सिंह

मंगळाचे हे नक्षत्रबदल तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. वाहनांशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात. मालमत्तेचा वाद सुरू असल्यास, त्यातून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात आनंद व शांततेचे वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो. तुम्ही नवीन लोकांना भेटणार आहात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर

हा काळ तुमच्यासाठी नफा व प्रगती घेऊन येऊ शकतो. व्यवसायात चांगल्या संधी निर्माण होतील आणि गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंद नांदेल आणि प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीसारखी चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबाबरोबरचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि तुम्हाला भविष्यातील योजनांवर काम करण्याची संधी मिळेल.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)