Mangal Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो.

पंचांगानुसार, ०३ मार्च २०२६ रोजी मंगळ राहू ग्रहाच्या शततारका नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळाचे हे नक्षत्र गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे. या नक्षत्र गोचराच्या प्रभावाने काही राशींच्या लोकांचा भाग्योदय होईल.

मंगळाचे नक्षत्र गोचर भरभरून देणार

मेष (Mesh Rashi)

मंगळाचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना देखील मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

सिंह (Singh Rashi)

मंगळाचे नक्षत्र गोचर सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे नक्षत्र परिवर्तन शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)