Mangal Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला भूमी, ऊर्जा, उत्साह, शक्ती, भूमी, भवनाचा कारक ग्रह मानले जाते. मंगळ ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन, नक्षत्र पद परिवर्तन, वक्री, मार्गी, अस्त देखील होतो. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. दरम्यान, शनी ग्रहाला न्यायदेवता म्हटले जाते. पंचांगानुसार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगळ ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. अनेकदा मंगळाचा कुंभ राशीतील प्रवेश लाभदायी मानला जात नाही. परंतु काही राशींच्या लोकांसाठी हे गोचर अनुकूल ठरू शकते.

मंगळाचे गोचर पदोपदी यश देणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळचा कुंभ राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल.

धनु (Dhanu Rashi)

मंगळाच्या कुंभ राशीतील प्रवेशाने धनु राशीच्या लोकांना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल.

वृषभ (Vrushabh Rashi)

मंगळाच्या राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.

कुंभ (Kumbha Rashi)

मंगळाचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)