Mangal Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो.
पंचांगानुसार, मार्चमध्ये मंगळ दोन वेळा नक्षत्र गोचर करणार आहे. मंगळ ३ मार्च २०२६ रोजी ११ वाजून ०२ मिनिटांनी शततारका नक्षत्रात प्रवेश करणार असून २० मार्च २०२६ रोजी ०९ वाजून २९ मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळाचे हे दोन वेळा होणार नक्षत्र गोचर काही राशींचे भाग्य उजळवणारे असेल.
मंगळाचे नक्षत्र परिवर्तन आयुष्य बदलणार
कन्या (Kanya Rashi)
मंगळाचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
मेष (Mesh Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना देखील मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. बँक बॅलन्समध्ये भरपूर वाढ होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. आनंदी राहाल, मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे नक्षत्र परिवर्तन शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

