Mangal Nakshatra Gochar: मंगळ ग्रहाला ज्योतिष्याशास्त्रात क्रुर ग्रहांच्या श्रेणीमध्ये गणले जाते. त्याची स्थितीनुसार कुंडलीत मांगलिक दोष निर्माण होतो. ३ मार्चला रात्री मंगळ ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात गोचर केले आहे. अशा परिस्थितीमध्ये मंगळाचे गोचर काही राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. २० मार्चपर्यंत मंगळ या नक्षत्रात राहणार आहे आणि ३ राशींना या काळात सतर्क राहावे लागेल. चला जाणून घेऊ या कोण-कोणत्या आहेत या राशी.

कर्क राशी (Cancer)

मंगळाचे राहू नक्षत्रात गहोचर तुमच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण करू शकते. कौंटुबिक जीवनात सांभाळून राहा.विवाहित लोकांना जोडीदाराबरोबर विचार करून संवाद साधावा अन्यथा वाद होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतही या राशीच्या लोकांना सतर्क राहाण्याची आवश्यकता आहे. सामाजिक पातळीवर अशा लोकांपासून दूर राहा जे नकारात्मक बोलतात. उपाय म्हणून भगवान शंकराची पूजा करा.

कन्या राशी (Libra)

शनभिषा नक्षत्रामध्ये मंगळाचा प्रवेश तुमच्या करिअरमध्ये चढ उतार निर्माण करू शकतो. उच्च पदावरील कर्मचाऱ्यांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. थोडे सतर्क राहा. विनाकारण चिंता करून तुमचा वेळ आणि उर्जा खर्च करू नका, मंगळाचे नक्षत्र गोचर तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले नाही. तुमचे पोट आणि हृदयाची विशेष काळजी घ्या. योग-ध्यान करने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मीन राशी (Pisces)

मंगळाचे नक्षत्र गोचरमुळे तुमच्या उर्जेत कमतरता होऊ शकते. आळस वाढल्याने काही काम बिघडू शकतात. करिअरमध्ये अशांतीत परिणाम न मिळाल्याने तुम्ही निराश होऊ शकते. परंतू तुम्ही धीर धरा आणि मेहनत करत राहा. कुटुंबातील लोकांबरोबर विचार करून संवाद साधा, तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. उपाय म्हणून हनुमान चालिसा वाचा.