Mars Nakshatra Transit 2025: ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन ही करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ वृश्चिक राशीत विराजमान असून ज्येष्ठा नक्षत्रामध्ये विराजमान आहे. डिसेंबरमध्ये मंगळ दोन वेळा नक्षत्र गोचर करणार आहे. या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा १२ पैकी काहींच्या व्यक्तींवर नक्कीच पाहायला मिळेल.

पंचांगानुसार, मंगळ ७ डिसेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रातून मूळ नक्षत्रात आणि २५ डिसेंबर रोजी पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.

डिसेंबरमध्ये मंगळाचे नक्षत्र गोचर करणार मालामाल

मेष (Mesh Rashi)

मंगळाचे नक्षत्र परिवर्तन प्रवेशमेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. समाजात मानसन्मान वाढेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)