वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक वेळाने आपली राशी बदलतात. ग्रहांचा हा बदल काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. मंगळ ग्रह १६ ऑक्टोबरला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. परंतु ३ राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण विशेषतः फायदेशीर सिद्ध होऊ शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • तूळ

मंगळ राशी बदलल्यामुळे तूळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. मंगळ ग्रह या राशीच्या नवव्या घरात भ्रमण करणार आहे. हे भाग्याचे आणि विदेश प्रवासाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळू शकते. यासोबतच रखडलेली कामेही मार्गी लागू शकतात. या काळात तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. ते एखाद्या परीक्षेत यशस्वी होऊ शकतात किंवा उच्च संस्थेत प्रवेश घेऊ शकतात.

October Panchak 2022: नवरात्रीनंतरचे पाच दिवस कोणतेही शुभ कार्य करता येणार नाही; जाणून घ्या कारण

  • सिंह

मिथुन राशीत मंगळाचे संक्रमण होताच सिंह राशीच्या लोकांना प्रचंड संपत्ती मिळू शकते. कारण मंगळ देव या राशीच्या अकराव्या घरात प्रवेश करणार आहे. हे उत्पन्न आणि नफ्याचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. तसेच, व्यवसायात विशेष नफा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्याही मजबूत व्हाल. यासोबतच या काळात तुमची कार्यशैलीही सुधारेल, यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. यावेळी तुम्ही शेअर मार्केट गुंतवणूक करू शकता. ही वेळ योग्य असल्याने फायदा होऊ शकतो.

October Month Horoscope 2022: ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशींच्या नशिबाचे दार उघडणार; जाणून घ्या तुमचे मासिक राशीभविष्य

  • कन्या

मिथुन राशीमध्ये मंगळाचे संक्रमण होताच या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो कारण या राशीच्या संक्रमण कुंडलीतून मंगळ दशम भावात प्रवेश करेल. हे व्यवसाय आणि नोकरीचे घर मानले जाते. यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची संभावना आहे. तसेच नोकरी करत असलेल्या लोकांना बढती मिळू शकते. यावेळी नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळू शकतात. त्याचबरोबर व्यवसाय विस्तारासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुम्ही मालमत्ता आणि वाहने खरेदी करू शकता किंवा मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर, या कालावधीत व्यवसायातील कोणताही विशेष करार निश्चित केल्यामुळेदेखील तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)