Mars Transit In Nakshatra 2023: द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार येत्या फेब्रुवारी महिन्यात २५ तारखेला मंगळ ग्रह हा स्वतःच्या नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. शनिवारी पहाटे ३ वाजून १६ मिनिटांनी हे परिवर्तन सुरु होणार आहे. सध्या मंगळ ग्रह रोहिणी नक्षत्रात अजून १३ जानेवारीला आपल्या स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश घेणार आहे. १३ मार्चला मंगळ वृषभ राशीतून मिथुन राशीत परिवर्तन करणार आहे. व तिथूनच पुढे आपल्या मृगशीर्ष नक्षत्रात मंगळाचे परिवर्तन होईल. जेव्हा कोणताही ग्रह आपल्या स्वतःच्या राशीत किंवा नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे नक्षत्र परिवर्तन होताच विशेषतः ३ राशींना प्रचंड धनलाभाची संधी आहे.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीचे स्वामी मंगळदेव आहेत तसेच वृषभ राशीचे नक्षत्र सुद्धा मृगशीर्ष आहे. यामुळे वृषभ राशीला येत्या काळात मंगळ परिवर्तनाने दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे. येत्या काळात वृषभ राशीत आधीच मंगळ स्थित असल्याने १३ मार्च पर्यंत ही रास उच्च स्थानी असू शकते. प्रचंड धनलाभासह आपल्या प्रगतीचे सुद्धा योग आहेत. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. येत्या काळात होणारा धनलाभ हा तुमच्या सेव्हिंग्समध्ये रूपांतरित करणे आपल्या हातात आहे. मानसिक स्वास्थ्य सुधारून तुम्हाला शांतता अनुभवता येऊ शकते. तुमच्या वाणीवर व खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

18th April Panchang & Rashi Bhavishya:
१८ एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसह ‘या’ राशींना धनलाभासह मिळेल जोडीदाराची साथ; आजचा अभिजात मुहूर्त कधी?
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
6th April Panchang Daily Marathi Rashi Bhavishya
६ एप्रिल पंचांग: शनीप्रदोष तुमच्या राशीसाठी काय फळ देणार? दुपारी ‘हा’ ४६ मिनिटांचा मुहूर्त आहे सर्वात शुभ
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?

मिथुन (Gemini)

मिथुन राशीचे नक्षत्र मृगशीर्ष असते तसेच १३ मार्च २०२३ पासून मंगळ ग्रह मिथुन राशीत स्थिर असणार आहेत. यामुळेच मिथुन राशीला येत्या काळात लाभदायक स्थितीचा अनुभव घेता येऊ शकतो. तुमच्या आई-वडिलांसह नातेसंबंध आणखी दृढ होण्याची शक्यता आहे. तसेच जोडीदाराची साथ लाभू शकते. तुमचा स्वाभिमान याकाळात तुम्हाला प्रगतीचे दार उघडू शकतो. आर्थिक बाजू सुद्धा मजबूत राहू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या.

हे ही वाचा<< मकरसंक्रांतीपासून ‘या’ ३ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; शनि-शुक्र युती ‘या’ मार्गाने बनवू शकते मालामाल

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक ही मंगळाच्या स्वामित्वाची रास आहे. यामुळे मंगळ नक्षत्र परिवर्तन करताच आपल्या राशीत सुद्धा बदल अनुभवता येऊ शकतात. वृश्चिक राशीच्या भाग्यात संमिश्र लाभ आहे. आपल्याला काळजीपूर्वक गुंतवणूक केल्यास मोठा धनलाभ होऊ शकतो. शेअर मार्केट मधून धनलाभाची मोठी संधी आहे. तुम्हाला भावंडासह नाती जपावी लागू शकतात. वृश्चिक रास ही बुध ग्रहाच्या प्रभावात सुद्धा असल्याने तुम्हाला विद्येची साथ लाभू शकते. येत्या काळात परीक्षेत प्रचंड घवघवीत यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)