Mangal Rashi Parivartan 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते; ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. २०२४ मध्ये शनी, बुध, गुरू व मंगळ हे चारही ग्रह वक्री होतील. सध्या बुध आणि शनि ग्रह वक्री अवस्थेत असून, २०२४ च्या शेवटी ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मंगळ कर्क राशीमध्ये वक्री होईल. पंचांगानुसार मंगळ ग्रह ७ डिसेंबर २०२४ रोजी ५ वाजून १ मिनिटापासून वक्री होईल आणि २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तो या राशीत वक्री राहील; ज्याचा शुभ किंवा अशुभ परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. या राशींना मिळणार बक्कळ पैसा (Mangal Rashi Parivartan 2024) मेष मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीमध्ये पदोन्नत्तीसह बदली होण्याची दाट शक्यता आहे. मालमत्तेसंबंधीचे वाद मिटतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. समाजात मान-सन्मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. नवी जमीन किंवा मालमत्ता खरेदी कराल. कर्क कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. सुख-समृद्धीत वाढ होईल. मित्रांसह पिकनिकला जायचा प्लान कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. हेही वाचा: चार दिवसांनंतर शनि देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींचे लोक होणार मालामाल कन्या मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यकारी ठरेल. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या काळात फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. (टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)