Mangal Transit In Karka 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.

पंचांगानुसार, २० ऑक्टोबर रोजी मंगळाने त्याची नीच राशी असलेल्या कर्क राशीमध्ये प्रवेश केला असून तो पुढील १३८ दिवस राहील. मंगळाचा हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.

shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

मंगळाचे राशी परिवर्तन तीन राशींसाठी खास

मेष

मेष राशींच्या व्यक्तींसाठी मंगळाचे कर्क राशीतील राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समाधान प्राप्त होईल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल.

कर्क

कर्क राशींच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.वैवाहिक जीवन सुखमय राहील. आयुष्यातीस संकटं दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवी संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.

हेही वाचा: सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

वृश्चिक

मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. स्पर्धा परिक्षेची तयार करत असणाऱ्यांना हवे तसे यश संपादीत करता येईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल.स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नात्यातील दूरावा दूर होईल. मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader