Mangal-Shani Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाला खूप खास मानले जाते. इतर ग्रहांप्रमाणे मंगळदेखील निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. तसेच शनी देखील अडीच वर्षातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. येत्या जुलै महिन्यामध्ये शनी आणि मंगळ या दोन प्रभावशाली ग्रहांचे गोचर होणार आहे. मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार असून शनीदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा १२ राशीच्या व्यक्तींवर अधिक चांगला प्रभाव पडेल.
मंगळ-शनी तीन राशींचे करणार मंगल
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ-शनीचे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
सिंह (Singh Rashi)
मंगळ-शनीचे गोचर सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला विशेष लाभ पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. घरात सुख, शांती नांदेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहिल.
कुंभ (Kumbh Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळ-शनीचे गोचर अधिक लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल.
(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)