Mangal Shani Labh Drishti Yog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र बदलांसोबतच त्यांची इतर ग्रहांसोबतची युती किंवा दृष्टी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा दोन मोठे ग्रह विशेष परिस्थितीत समोरासमोर किंवा विशिष्ट कोनात येतात, तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर होतो. अशीच एक स्थिती १९ जुलै रोजी मंगळ आणि शनी यांच्यामध्ये निर्माण होत आहे. या दिवशी, रात्री सुमारे ११:३० वाजता मंगळ आणि शनी ६० अंशांच्या कोनात असतील.
या विशेष स्थितीमुळे एक शुभ दृष्टी योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि नेतृत्वाचा कारक मानला जातो, तर शनी शिस्त, संयम आणि कर्माचे फळ देणारा ग्रह मानला जातो. या दोन ग्रहांमध्ये तयार होणारा हा दृष्टी योग अत्यंत सकारात्मक मानला जातो, जो जीवनात प्रगती घडवून आणतो. या योगाचा खालील चार राशींच्या लोकांवर सर्वात शुभ प्रभाव पडणार आहे.
१. मेष राशी (Aries Zodiac Sign)
लाभ दृष्टी योग मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. या काळात बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून उत्तम पाठिंबा आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल.
२. वृश्चिक राशी (Scorpio Zodiac Sign)
हा लाभ दृष्टी योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक बळकटी देणारा ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत चांगली बातमी मिळू शकते. कुटुंब आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
३. मकर राशी (Capricorn Zodiac Sign)
करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत हा योग मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली व्यावसायिक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन सौदे आणि मोठ्या ग्राहकांकडून आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन अधिकार आणि प्रगतीच्या सुवर्णसंधी मिळतील.
४. कुंभ राशी (Aquarius Zodiac Sign)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ-शनीचा शुभ दृष्टी योग व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. मानसिक ताण आणि चिंता यांपासून हळूहळू सुटका मिळेल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
