Mangal Shani Yuti Make Kendra Drishti Yog : ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ व शनीच्या विशेष स्थितीमुळे केंद्र दृष्टी योग निर्माण होणार आहे. मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी, दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी, मंगळ व शनी एकमेकांशी ९० अंशाच्या कोनात येतील, ज्यामुळे हा विशेष योग निर्माण होईल. जरी हा योग मर्यादित कालावधीसाठी टिकणार असला तरीही मंगळ व शनी हे दोन्ही ग्रह ज्योतिषशास्त्रानुसार प्रभावशाली मानले जातात, त्यामुळे त्यांच्या विशेष स्थितीचा प्रभाव अनेक राशींच्या जीवनात दिसून येतो. विशेषतः चार राशींसाठी, हा काळ करिअर, व्यवसाय, आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामाला गती मिळू शकते, कठोर परिश्रमातून चांगले फळ मिळू शकते, आर्थिक समस्यांपासून सुटका होण्याची शक्यता आहे. मंगळ-शनी केंद्र दृष्टी योगाचा कोणत्या चार भाग्यवान राशींना फायदा होऊ शकतो जाणून घेऊया.
मेष
मंगळ-शनि केंद्र दृष्टी योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल, व्यवसायातील नफा वाढून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. एका दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कायदेशीर प्रकरणात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. जीवनातील संघर्ष हळूहळू कमी होतील, तसेच नातेसंबंधही पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता दिसते आहे.
वृश्चिक
हा योग तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आत्मविश्वास आणि तुमची ऊर्जाही वाढेल. कामाच्या ठिकाणी, तुम्ही तुमची कामे पूर्ण करण्यावर उत्साहाने लक्ष केंद्रित कराल. एखाद्या जुन्या मित्राकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळाल्यास प्रलंबित काम पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. आर्थिकदृष्ट्याही काळ अनुकूल असू शकतो आणि आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात.
धनु
तुमच्यासाठी मंगळ व शनिचा केंद्र दृष्टी योग प्रगतीचे नवीन मार्ग खुले करू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळाल्याने आनंद मिळेल, मानसिक ताण कमी होईल. जर तुम्ही नोकरी, व्यवसाय सुरू करण्याची किंवा तुमचा व्यवसाय परदेशात वाढवण्याची योजना आखत असाल. तर यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्यांना वाढीव आदर आणि मान्यता मिळू शकते. तसेच उत्पन्न वाढीच्या नवीन संधीही निर्माण होतील.
मकर
हा योग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, जुने प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची संधी मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेला निधी परत मिळण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात, महत्त्वाचे निर्णय घेण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाचे पद मिळू शकते.
