scorecardresearch

Mangal Shani Yuti: पुढील १५ दिवस ‘या’ राशींच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी; शनि-मंगळची युती करू शकते नुकसान

या महिन्याची म्हणजेच मे २०२२ ची सुरुवात शनि आणि मंगळाच्या संयोगाने होत आहे, ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे.

Astrology
हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत आहेत, ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

ज्योतिष शास्त्रात शनि आणि मंगळ हे दोन्ही ग्रह खूप महत्वाचे मानले जातात. शनिच्या अशुभ स्थितीमुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास होतो, तर मंगळाच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होते. या महिन्याची म्हणजेच मे २०२२ ची सुरुवात शनि आणि मंगळाच्या संयोगाने होत आहे, ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत आहेत, ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना त्रास सहन करावा लागू शकतो. पुढील १५ दिवस कोणत्या लोकांना खूप काळजी घ्यावी लागेल हे जाणून घेऊया.

शनि आणि मंगळ हे केवळ प्रबळ ग्रह नाहीत तर ते एकमेकांचे शत्रूही आहेत. अशा परिस्थितीत हे दोन ग्रह एकाच राशीत असल्यामुळे त्यांच्यात द्वंद्वयुद्धाची परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच त्यांच्या संयोगाला दुहेरी योग म्हणतात. या योगाचा ३ राशींवर वाईट परिणाम होईल. या काळात या राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तसेच, मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा आणि शनिवारी शनिदेवाची पूजा, मंत्र जप करावा.

सोशल मीडिया स्टार किली पॉलवर अज्ञातांनी चाकूने केला हल्ला; इंस्टाग्रामवरून दिली घटनेची माहिती

कर्क – कर्क राशीच्या लोकांसाठी शनि-मंगळाचा योग शुभ नाही. त्यांच्यासोबत काही दुर्घटना होऊ शकते. तुम्ही अपघात, दुखापत आणि जखमांना बळी पडू शकता. कामाच्या ठिकाणी कोणताही धोका न पत्करता हा वेळ संयमाने घेणे चांगले.

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी शनि-मंगळाच्या या दुहेरी योगाचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पौष्टिक पदार्थ खा. बाहेरचे खाणे टाळा. थकवा देखील वाढू शकतो.

कुंभ – या राशीत मंगळ-शनिची युती होत असल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वात अडचणींचा ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी आवेशात येणे, कडू बोलणे आणि गर्विष्ठ होणे टाळावे, अन्यथा त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी काळजी घ्या. चुकूनही वादात पडू नका.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mangal shani yuti people of this zodiac sign should take special care for next 15 days saturn mars alliance can do damage pvp