Trigrahi Rajyog 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये काही ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ राशींवर पडतो. ०२ एप्रिल २०२६ रोजी, धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचा ग्रह मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत आधीपासूनच सूर्य आणि शनी हे दोन ग्रह विराजमान आहेत. ज्यामुळे मीन राशीत मंगळ, सूर्य आणि शनीचा त्रिग्रही राजयोग निर्माण होईल. या योगाचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर अधिक लाभदायी ठरेल.
त्रिग्रही राजयोग ‘या’ राशींना भरभरून यश देणार
सिंह (Singh Rashi)
सिंह राशींच्या व्यक्तींसाठीही त्रिग्रही राजयोग खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.
मीन (Meen Rashi)
मीन राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा त्रिग्रही राजयोग खूप उत्तम सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील; ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मीन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे.
मकर (Makar Rashi)
त्रिग्रही योग मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा त्रिग्रही राजयोग अनुकूल सिद्ध होणार आहे, आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
