Mangal Uday 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाचं स्थान फार विशेष मानलं जातं. ग्रहांचा सेनापती म्हणून त्याला ओळखले जाते. मंगळाचा उदय हा ऊर्जा, धैर्य, निर्णायकता आणि कृती यांचे प्रतीक मानला जातो. जेव्हा मंगळ बलवान स्थितीत असतो, तेव्हा अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात.यात २ मे रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी मंगळाचा उदय होईल, जो अत्यंत शुभ आणि प्रभावी मानला जातो. ज्याचा १२ राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येईल, पण अशा काही राशी आहेत. ज्यांना या काळात करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती साधता येईल.
जेव्हा मंगळाचा उदय होतो, तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यामध्ये कामाच्या ठिकाणी जलद निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. यामुळे २ मेपासून मंगळाचा होणारा उदय पदोन्नती, नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या विस्ताराचा विचार करणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल.
मेष
मेष राशीसाठी मंगळाचा उदय सर्वात प्रभावशाली मानला जातो, कारण तो मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. या काळात रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि दीर्घकाळ रखडलेले प्रोजेक्ट पुढे सरकू लागतील. आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा जाणवेल. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि कठोर परिश्रमातून सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे.
सिंह
सिंह राशीसाठी मंगळ उदय फलदायी ठरु शकतो. आर्थिक स्थैर्य आणि करिअरमध्ये वाढ होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिकार मिळू शकतो, नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. पदोन्नती किंवा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी मंगळाचा उदय अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो. जुने वाद आणि तणाव संपुष्टात येऊन मनःशांती लाभण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि गुंतवणुकीच्या बाबतीत लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बचतीत वाढ होण्याचे संकेत आहेत.
मकर
मंगळाचा उदय या काळात मकर राशीच्या लोकांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल. ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधू शकतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. उत्साहाने नवीन प्रकल्प सुरू करण्यात यश मिळेल.
(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
