Mangal Vakri 2022: ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह आणि राशी एका विशिष्ट वेळी संक्रमण करतात. ग्रहाची स्थिती ज्यानुसार बदलते त्याप्रमाणे अन्य राशींच्या आयुष्यात बदल घडून येतात. हिंदू धार्मिक मान्यतांनुसार ग्रहांचे गोचर अर्थात संक्रमण हे काही राशींसाठी फलदायी तर काहींसाठी विघ्नदायी ठरू शकते. येत्या नवरात्रीत अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे मात्र यात मंगळाचे गोचर सर्व राशींच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकते.

मंगळ ग्रह ३० ऑक्टोबरला विक्री होणार आहे तत्पूर्वी १६ ऑक्टोबरला मंगळाचे गोचर म्हणजेच संक्रमण होईल. संक्रमणानंतर मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ३० ऑक्टोबर २०२२ ला संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी मंगळ ग्रह वक्री होईल. नोव्हेंबरच्या १३ तारखेपर्यंत मंगळ या स्थितीत असणार आहे. यामुळे काही राशींना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. अशावेळी अगोदरच सतर्क राहणे या राशींसाठी हिताचे ठरेल. चला तर पाहुयात कोणत्या राशींवर मंगळ वक्रीचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
Shani Nakshatra Parivartan
पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा
Shani Dev Vakri In Kumbh saturn vakri in Aquarius these three zodiac sign big success in life
३० वर्षांनंतर शनिदेवाची कुंभ राशीत वक्री चाल; ‘या’ राशींना येतील सोन्याचे दिवस? मिळू शकेल बक्कळ पैसा

Jupiter Opposition: १६६ वर्षांनी ‘या’ दिवशी गुरु व पृथ्वी येणार सर्वात जवळ; शनीचेही होणार दर्शन, कुठे व कसे पाहाल?

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ सहावा प्रभावशाली स्वामी मानला जातो. यावेळेस मंगळाच्या वक्रीने या राशीच्या व्यक्तींवर प्रभाव दिसून येऊ शकतो. विशेषतः कामाच्या बाबत म्हणजेच ऑफिसमध्ये समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्ही प्रयत्न पूर्ण करूनही फळ मिळताना तुम्हाला मागे पडल्याची भावना त्रास देऊ शकते. काहींच्या बाबत प्रेमसंबंधी व वैवाहिक जीवनातही अडथळे येण्याचे संकेत आहेत. स्वास्थ्य जपून काम करणे हे कधीही हिताचे ठरेल.

कर्क

कर्क राशीसाठी मंगळ हा पाचवा व दहावा प्रभावशाली स्वामी आहे. या मंगळ वक्रीने कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक खर्च उद्भवण्याची चिन्हे आहेत. स्वास्थ्याच्या बाबत सर्वाधिक खर्च होऊ शकतो त्यामुळे अगोदरच आरोग्याची काळजी घेणे हिताचे ठरेल. कामाच्याबाबत मात्र तुम्हाला शुभवार्ता समजण्याचे संकेत आहेत.

कुंभ

ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रह हा तिसऱ्या व दहाव्या स्थानावर प्रभावी आहे. या व्यक्तींना तणावात निर्णय घ्यावे लागू शकतात. कामाच्या ठिकाणी खूप विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. सर्वात मुख्य म्हणजे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे खूप फायदेशीर ठरू शकते.

कन्या

कन्या राशीसाठी मंगळ हा आठवा प्रभावशाली ग्रह आहे. या व्यक्तींना मंगळ वक्रीने कामाचा तणाव अधिक जाणवू शकतो मात्र तुम्ही लक्ष देऊन काम केल्यास व आरोग्याची काळजी घेतल्यास पुढील काळ फार कठीण जाणार नाही.

वृषभ

मंगळाचा सर्वाधिक प्रभाव हा वृषभ राशीवर असणार आहे, कारण मंगळ हा या राशीच्या प्रभावकक्षेत दुसऱ्याच स्थानी आहे. प्रेमाच्याबाबत थोड्या फार प्रमाणात समस्या येऊ शकतात पण डोकं थंड ठेवून वागल्यास तुम्ही यावर मात करू शकाल. या राशीच्या व्यक्ती स्वभावाने मोकळ्या असल्याने त्यांना खूप खर्चाची सवय असते त्यामुळे मंगळ वक्री होताना हात आखूडता घेणे हिताचे ठरू शकते.

(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)