Mangal Vakri In 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह मार्गी होतात किंवा वक्री होऊन इतर राशीत गोचर करतात तेव्हा त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष प्रभाव हा सर्वच राशींमध्ये दिसून येतो. विशेषतः काही शक्तिशाली ग्रह, जसे की शनि किंवा मंगळ जेव्हा अन्य राशीत मार्गक्रमण करू लागतात तेव्हा सर्व १२ राशींना शुभ- अशुभ परिणाम जाणवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. वैदिक ज्योतिषात, मंगळ ग्रह हा ऊर्जा, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्य यांचा कारक आहे. येत्या नववर्षात १३ जानेवारीपर्यंत मंगळ ग्रह वृषभ राशीत वक्री अवस्थेत राहणार आहे परिणामी ३ राशींच्या कुंडलीत मोठे बदल घडण्याची संधी आहे. या तीन राशींना अपार धनसंपत्ती लाभण्याची व व्यवसाय वृद्धीची संधी असून या संधीचं सोनं करणं मात्र तुमच्याच हातात असेल. या तीन राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होणार हे जाणून घेऊयात..

कर्क

कर्क राशीच्या प्रभाव कक्षेत मंगळ ग्रह स्थिर होताना अनेक लाभांची संधी आहे. मंगळ वक्रीमुळे या राशीच्या कुंडलीत मंगळ परम राजयोग सुद्धा तयार होत आहे, कर्क राशीत मंगळ पाचव्या व दहाव्या स्थानी वक्री होऊन स्थिर होणार आहे. आपल्याला या काळात आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत, विशेषतः गुणत्वनिकांतून नफा मिळवण्याची ही सुवर्णसंधी ठरू शकते. आपल्या मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्याला मित्र परिवार किंवा कुटुंबियांसह एखाद्या लांबच्या ठिकाणी प्रवासाचे योग आहेत.

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

सिंह

मंगळ ग्रह वक्री झाल्याने सिंह राशीच्या मंडळींना करिअर व व्यवसायात वृद्धीचा लाभ होऊ शकतो. सिंह राशीच्या कुंडलीत मंगळ ग्रह चौथ्या व दहाव्या स्थानी गोचर करणार आहे, हे भाग्याचे स्थान असल्याने सिंह राशीला येत्या काळात प्रचंड धनलाभाचे संधी आहे. मंगळ ग्रह जेव्हा कोणत्याही राशीच्या दहाव्या स्थानी गोचर करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्वाधिक जाणवतो परिणामी सिंह राशीसाठी पुढचे दोन महिने अच्छे दिन असणार आहेत. भौतिक सुखाचे योग या मंडळींच्या नशिबात आहेत.

यंदा मार्गशीर्ष गुरुवार कधी सुरु होत आहेत? महालक्ष्मी व्रताची तिथी, महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या

ज्योतिषांच्या माहितीनुसार, जे लोक राजकारणात सक्रिय आहेत त्यांना मोठे पद प्राप्त होण्याचे संकेत आहेत, समाजकार्य करणाऱ्यांची प्रतिष्ठा व मान वाढू शकतो. तर बेरोजगारांसाठी येत्या काळात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

धनु

मंगळ ग्रह वक्री होणे हे धनु राशीसाठी शुभ ठरू शकते. आपल्या कुंडलीत मंगळ ग्रह पाचव्या व बाराव्या स्थानी गोचर करणार आहे. ज्योतिषांच्या माहितीनुसार हे स्थान रोग, ऋण व शत्रूचे स्थान मानले जाते, मंगळ गोचर झाल्याने धनुच्या कुंडलीत विपरीत राजयोग निर्माण होत आहे. याचा प्रभाव आपल्याला व्यवसायात व खाजगी आयुष्यात दिसून येऊ शकतो.

वृश्चिक राशीत ३ मुख्य ग्रहांचा त्रिकोण; ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत ३० दिवसात मोठ्या बदलाचे संकेत

जर आपले काम विदेशी कंपनीशी संबंधित असेल तर लवकरच आपल्याला मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतूनच आता नफ्याचे योग्य आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आपले कौतुक झाल्याने मान वाढू शकतो.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)