Mangaladitya Rajyog: वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असतो. जेव्हा दोन शक्तिशाली ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा एक विशेष योग तयार होतो. असा एक महत्त्वाचा योग म्हणजे मंगलादित्य राजयोग. हा योग तेव्हा तयार होतो, जेव्हा सूर्य देव आणि मंगळ देव एकाच राशीत येऊन युती करतात.

फ्युचर पंचांगानुसार २ एप्रिलपासून सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळे मीन राशीत मंगलादित्य राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग सुमारे १८ महिन्यांनंतर तयार होत आहे, कारण मंगळ ग्रह १८ महिन्यांनंतर मीन राशीत प्रवेश करत आहेत.

या राजयोगाचा परिणाम अनेक राशींवर दिसू शकतो, पण विशेषतः मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ मानला जात आहे. या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे. तसेच मन आनंदी राहू शकते. याशिवाय देश-विदेशात प्रवास करण्याची संधीही मिळू शकते.

सूर्य आणि मंगळ यांच्या युतीचे ज्योतिषीय महत्त्व

वैदिक ज्योतिषानुसार सूर्य आणि मंगळ यांची युती ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा मजबूत संयोग मानला जातो. हा योग व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो आणि त्याला आपल्या ध्येयाकडे वेगाने पुढे जाण्याची प्रेरणा देतो. ज्योतिष मान्यतेनुसार या युतीच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये नेतृत्वगुण, प्रशासकीय क्षमता आणि स्पर्धेत जिंकण्याची ताकद वाढते.

जर कुंडलीत हा योग शुभ स्थितीत तयार झाला, तर व्यक्तीला करिअर, राजकारण, प्रशासकीय क्षेत्र आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच अशी व्यक्ती धाडसी आणि पराक्रमी असते. ती जोखीम असलेली कामे करण्यास तयार असते. अशा लोकांकडे चांगली संपत्तीही असू शकते. तसेच मंगळ आणि सूर्य यांच्या प्रभावामुळे काही लोक प्रशासकीय सेवेतही जाऊ शकतात.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा राजयोग खूप लाभदायक ठरू शकतो. कारण मंगळ ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच हा राजयोग तुमच्या राशीपासून १२व्या भावात तयार होणार आहे. या काळात करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते.

तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात आणि उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. पण या काळात काही फाजील खर्च होऊ शकतात. त्यामुळे बजेट बनवून खर्च केला तर ते अधिक चांगले ठरेल.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगलादित्य राजयोग सकारात्मक ठरू शकतो. कारण सूर्य देव तुमच्या राशीचे स्वामी आहेत. तसेच हा राजयोग तुमच्या राशीपासून आठव्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात नोकरीत बढती मिळू शकते किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.

तसेच परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होऊ शकते आणि गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र गुंतवणूक करताना काळजी घ्या आणि एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा योग करिअर आणि व्यवसायात प्रगती देणारा ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून चौथ्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात नवीन योजना यशस्वी होऊ शकतात आणि व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळू शकतात.

तसेच या काळात तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. मात्र प्रॉपर्टी घेताना नीट तपासणी करूनच निर्णय घ्या. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. तसेच आर्थिक बाबतीतही सुधारणा होण्याचे योग आहेत. फक्त आईच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)